आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीसाठी बंदी घातलेल्या नव्वद लाखांच्या खताचा घोळ कायम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दहा जून रोजी पकडलेल्या 90 लाखांच्या खत साठय़ाबद्दल अजूनही काहीच निर्णय लागत नसल्यामुळे हा साठा कुठून आला, कोणासाठी आला व कुठे जाणार या प्रश्नाची उत्तरे आज तरी प्रशासनाकडे नसल्यामुळे 90 लाखांच्या खताविषयी घोळ कायमच आहे.
दहा जून रोजी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड काकीनाडा (आंध्र प्रदेश) या कंपनीचे 14:35:14 हे वाण जालन्यात रेल्वेच्या माध्यमातून आले होते. साडेसातशे मेट्रिक टन खतसाठा कंपनीने दिलेल्या पत्त्यावर या खताची वाहतूक करणार्‍या राहुल जैन यांनी पाठविला. शहरातील उड्डाणपुलाजवळ असलेल्या 350 मेट्रिक टन आणि नवीन औद्योगिक वसाहतीतील 400 मेट्रिक टन असे हे खत साठविण्यात आले.
यासंबंधीची माहिती मिळताच कृषी सभापती मनीष र्शीवास्तव यांच्यासोबत कृषी विभागाच्या आर.के.चौधरी, अग्निहोत्री यांनी रात्री आठ वाजता धाडी टाकून 50 किलोची एक अशा सुमारे 12 ते 15 हजार बॅग जप्त केल्या होत्या. रात्री उशीर झाल्यामुळे हा माल कुणाचा हे सांगता येत नसले तरी कंपनीने दिलेल्या पत्त्यावर हा माल आला असल्याचे वाहतूकदार राहुल जैन यांनी सांगितले होते.
यासंदर्भातची अधिक माहिती कृषी विभाग दुसर्‍या दिवशी देणार होता. मात्र, सात महिन्यांनंतर आजही याविभागाकडे विक्रीसाठी बंदी घातलेल्या या खताबद्दल काहीच माहिती नाही.
हे खत कोठे जाणार होते याबद्दल सांशकता व्यक्त केली जात आहे. लाखो रुपयांचे हे खत अजूनही पडूनच असल्यामुळे हे प्रकरण नेमके कशासाठी पडून आहे, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतकर्‍यांना खताची गरज होती. त्यावेळी हे खत मिळाले नाही. उलट या खताची मागणी शेतकर्‍यांनी केली नाही आणि नवीन वाहन असल्यामुळे त्याला उठावही नाही म्हणूनच संबंधित कंपनी याकडे लक्ष देत नाही. तसेच कृषी आयुक्तांकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करून तेदेखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या खताचा घोळ अजूनही कायमच आहे.