आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादात हाणामारी, दोन्ही भावांचे संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शेतीच्या वादावरून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबात हाणामारी झाली. यात जण जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस पाटील नीळकंठ मुकुंदराव पाटील यांनी दिली.

सुजलेगाव येथील मारुती महाजन तुमवाड (५५) आणि बालाजी महाजन तुमवाड (५०) या दोन भावांत २० गुंठे शेतीवरून वाद होता. वडिलोपार्जित इस्टेटीच्या वाटणीत हा २० गुंठे जमिनीचा तुकडा वादग्रस्त ठरल्याने हा वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी याच वादातून दोन्ही भावांत बाचाबाची झाली. गावातील प्रतिष्ठितांनी मध्यस्थी करून तो वाद शमविला. शनिवारी पोलिस पाटलांनी मारुती तुमवाड यांची पत्नी मुलगा यांना कुंटूर पोलिस ठाण्यात वादाच्या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरिता पाठविले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी रविवारी बैठक घेऊन वाद मिटविण्याचे आश्वासन दिले, परंतु तत्पूर्वीच दोन्ही भावांच्या कुटुंबांनी हाणामारी केली.

मारुती तुमवाड, त्यांचे कुटुंबीय बालाजी तुमवाड त्यांचे कुटुंबीय सकाळी वाजताच्या दरम्यान वादग्रस्त २० गुंठे जमिनीवर पेरणी करण्यासाठी गेले. दोन्ही भावांच्या कुटुंबीयांनी कोयते, कुऱ्हाडी, काठ्यांचा वापर करून एकमेकांना बेदम मारहाण केली. यात मारुती तुमवाड, पत्नी लक्ष्मीबाई तुमवाड, मुले माधव तुमवाड, संभाजी तुमवाड, महानंदा तुमवाड हे पूर्ण कुटुंब जखमी झाले. लहान भाऊ बालाजी तुमवाड, पत्नी महानंदा तुमवाड, मुले महेश बालाजी तुमवाड, योगेश बालाजी तुमवाड हे पूर्ण कुटुंब जखमी झाले.

नायगाव तालुक्यातील तुमवाड कुटुंबात हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबातील जण जखमी झाले. शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...