आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगापूर साखर कारखाना निवडणूक; बंब, डोणगावकर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - गंगापूर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १२ जून रोजी होत आहे. यात २१ संचालकांची निवड होणार आहे. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३८ उमेदवारांपैकी ९५ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ४२ जण निवडणूक रिंगणात उरले. यात आमदार प्रशांत बंब आणि कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.

लासूर स्टेशन गटातून दोन पॅनलप्रमुख निवडणुकीच्या रिंगणात अाहेत. त्यामध्ये आमदार प्रशांत बंब व कृष्णा पाटील डोणगावकर यांचा समावेश आहे. इतर उमेदवारांमध्ये दादासाहेब जगताप, शेषराव जाधव, लक्ष्मण वाघ, अशोक जगताप यांचा समावेश आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव व भाऊसाहेब पदार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जामगाव गटातून ३ जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये शेख गुलाब अब्दुल, सचिन माने, कचरू शिंदे, देविदास वाघ, रामनाथ वाघ, बाळासाहेब गायकवाड, गंगापूर गटातून ३ जागांसाठी देवेंद्र मोरे, सुभाष साळुंके, मुकुंद कसाने, लक्ष्मण भुसारे, राजेंद्र वाबळे, सुभाष वरकड हे ६ जण रिंगणात आहेत. शेंदुरवाद्यामधून ३ जागांसाठी अप्पासाहेब गावंडे, मधुकर चव्हाण, तुकाराम मिसाळ, कल्याण सुकासे, रामेश्वर मुंदडा, संजय गायकवाड उभे आहेत. वाळूज गटातून ३ जागांसाठी शेषराव पाटेकर, दिलीप बनकर, साहेबराव थोरात, बालचंद जाधव, भगवंत पल्हाळ, नारायण सोलकर हे उभे आहेत. एससी प्रवर्गातून मनोहर ठवाळ व गोरख तुपलोंढे हे रिंगणात आहेत.
पाटलांची माघार
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या प्रमुख उमेदवारांत कारखान्याचे विद्यमान चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या पॅनलच्या सर्व १७ उमेदवारांसह उमेदवारी मागे घेतली. याबाबत कैलास पाटील यांनी सांगितले, ८ वर्षांपासून बंद कारखान्याची अवस्था बिकट असून तो चालू करण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते.
बातम्या आणखी आहेत...