आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारादरम्यान काँग्रेस-अपक्ष उमेदवारांच्या पतींत हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ११ मध्ये दर्गा रस्त्यावर काँग्रेस व अपक्ष उमेदवाराच्या पतींमध्ये उडालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले असून याप्रकरणी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
   
महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून सोमवारी दर्गा रोड भागातील एका शादीखान्यात मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवार, समर्थकांत वादावादी झाली. त्यावरून निर्माण झालेला गोंधळ थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला. पैसे वाटप प्रकरणापाठोपाठ याच प्रभागातील काँग्रेस व अपक्ष उमेदवारांच्या पतींत वादावादी व नंतर हाणामारी झाली. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे महंमद गौस हे अपक्ष म्हणून शिलाई मशीन या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. म. गौस हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...