आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fight Between Pankaj Dhananjay Munde Over Cane Cutting Labourers

ऊसतोडणी कामगारांच्या नेतृत्वावरून पंकजा-धनंजय मुंडेंमध्‍ये रस्सीखेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडेंकडे आला असतानाच आता ऊसतोडणी कामगारांच्या नेतृत्वावरून मुंडे बहीण-भावात रस्सीखेच सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडेंनी कामगारांचे नेतृत्व स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यातच राज्यातील साखर कारखानदारांचे तारणहार अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांचे पालकत्वही आपल्याकडे राहावे यासाठी पावले उचलली आहेत. रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत गोपीनाथ मुंडेंचे कौतुक करतानाच यापुढे कामगार संघटनांचे नेतृत्व धनंजय मुंडेंकडे सोपवावे, अशी सूचना पवारांनी केली.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाराष्ट्राला भाजप नेते म्हणून असली तरी ते ऊसतोडणी कामगारांचे नेते ही त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांच्या बीड जिल्ह्याची ओळखही ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा अशी आहे. दरवर्षी भगवानगडावर मेळावा घेऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यावरची उत्तरेही शोधायचे. त्यांच्या पश्चात राजकीय वारसा सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घातले असले तरी सत्तेमुळे त्यांना येणाऱ्या मर्यांदा ओळखून शरद पवारांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना पुढे केले आहे. त्यांच्या माध्यमातून शरद पवारांनी ऊसतोडणी कामगार संघटनांना गळाला लावले आहे. म्हणजेच शरद पवार आता साखर कारखानदारांसोबत ऊसतोडणी कामगार आणि मजुरांचेही पालक बनण्याच्या तयारीत आहेत.

कशी मिळते कामगारांना मजुरी
राज्य शासन, साखर कारखानदार संघ आणि ऊसतोडणी मजूर युनियन यांच्यात दर तीन वर्षांनी तोडणी मजुरीच्या अनुषंगाने करार केला जातो. यापूर्वी २०११-१२ मध्ये प्रतिटन १९० रुपये मजुरीचा करार करण्यात आला होता. त्याची मुदत गेल्या वर्षी संपली. त्यावेळी २० टक्के दरवाढ होणे अपेक्षित होते. साखर कारखानदार आणि राज्य शासनाने रस न दाखवल्यामुळे गेल्या वर्षी हा करार होऊ शकलेला नाही.

पुढे वाचा.. धनंजय मुंडे पाठपुरावा करतात-पवार