घाटनांद्रा - सिल्लोड-पाचोरा ही बस १२:३० वाजता पाचोराकडे जात असताना तळणी येथून बबलू पुंजाराम काळे हा एसटी बसमध्ये बसला होता. दरम्यान, वाहक संजय विनायक दांडगे यांनी त्यास तिकिटाविषयी विचारणा केली असता मी तिकीट दाखवत नाही काय करायचे करा, असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाहक संजय दांडगे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला.