आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाहतुकीच्या भाड्यावरून दोन गटांत हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर : अवैध वाहतुकीच्या भाड्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान होऊन दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. यात सुमारे १४ जण जखमी झाले असून यातील दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे. सद्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून तणावपूर्ण शांतता आहे. या दगडफेकीमुळे गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती.
शेख मोहम्मद तौफिक, शेख कामराज जमीर, शेख जमीर लड्डू, अलका जगताप, प्रकाश बागूल, अमोल बागूल, विशाल बागूल, राजू बागूल, भिवसेन बागूल, विक्रम बागूल, राहुल बागूल, रणजित शिंदे, राजू बागूल, मंगल बागूल अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खंडाळा येथील चंद्रकांत ऊर्फ भास्कर बागूल व शेख अन्सार या दोघांची रिक्षा व छोटा हत्ती आहेत.गुरुवारी सकाळी बसस्थानकावर या दोघांत वाहनाच्या भाड्यावरून हमरीतुमरी होऊन दोघांत हाणामारी झाली होती.
याप्रकरणी नानूबाई बागूल यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी अन्सार शेख, निसार शेख, इसाक शेख व मुस्ताक शेख या चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. तर शेख अन्सार याने दिलेल्या तक्रारीवरून भास्कर बागुल, त्याची आई (नाव माहीत नाही), सागर बागूल व सिद्धेश बागूल यांच्याविरुद्धही अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता.
दरम्यान सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास या कारणावरून दोन्ही गटात पुन्हा कुरबुर झाली. पाहता पाहता याचे पर्यवसान तुंबळ मारामारीत झाले. दोन्ही गटाकडून भर रस्त्यावर तुफान दगडफेक सुरू झाल्याने व्यापा-यांनी आपआपली दुकाने बंद केली. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसमोर दगड येत असल्याने त्यांनी बचावासाठी दुकानांचा आसरा घ्यावा लागला.
बातम्या आणखी आहेत...