आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत प्रसादालयात हाणामारी; १० जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी | शिर्डी येथील साई प्रसादालयामध्ये बॅरिकेड्सवर बसण्याच्या कारणावरून मुंबईच्या कांदिवली येथील पालखीचे भक्त व संस्थान सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये ८ ते १० जण जखमी झाले आहेत. जखमींना राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कांदिवली (मुंबई) येथून साईकाली पालखी शिर्डी देवस्थान येथे दाखल झाली होती. पालखीत आलेले भक्त साईबाबा देवस्थानच्या प्रसादालयात गेले. प्रसादालयातील बॅरिकेड्सवर काही भक्त बसले असता त्यांना संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी बॅरिकेड्सवर बसू नका, असे सांगितले. या कारणावरून साईभक्त व संस्थानचे सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये दोन्ही बाजूंचे ८ ते १० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...