आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरेंच्या विरोधात अंबाजोगाईत खटला, आठ सप्टेंबरला सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात २० ऑगस्ट २०१५ रोजी फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी ८ सप्टेंबर २०१५ रोजी होणार आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासह मराठा व बहुजन समाजाविषयी "राजा शिवछत्रपती' या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे. या प्रकरणी येथील विधिज्ञ बालासाहेब निंबाळकर यांनी बळवंत मोरेश्वर पुरंदरे व पुरंदरे प्रकाशन यांच्या विरोधात अंबाजोगाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला असून त्याची सुनावणी ८ सप्टेंबरला होणार आहे. अॅड. निंबाळकर यांच्यामार्फत ॲड. विवेक स्वामी यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

पुरंदरेंच्या लिखाणाला पुरावा नाही
बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात कसलाही एेतिहासिक पुरावा नसून बदनामीकारक लिखाण आधारहीन आहे. हे लिखाण त्यांनी मनाने लिहिलेले आहे. शिवरायांच्या कालखंडात स्त्रियांचा मानसन्मान होत नव्हता, स्त्रियांचा बाजार होत होता, याला पुरावा नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. अॅड. बालासाहेब निंबाळकर, अंबाजोगाई