आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर सीरियल रेपिस्ट लातूरामध्‍ये गजाआड!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे 13 जून रोजी सातवर्षीय मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस अटक करण्यात असून त्याने 21 मे रोजी चिकलठाणा येथील दहावर्षीय मुलीवरही बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. संतोष नारायण कुकर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी पत्रकार
परिषदेत दिली.


खरोळा येथील मुलीला घरासमोरून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला होता. त्यामुळे तिची प्रकृती नाजूक बनली होती. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून आता तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अशीच घटना 21 मे रोजी लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथे घडली होती. दहावर्षीय मुलीवर नदीकाठी बलात्कार करून तो फरार झाला होता. या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश येत होते. त्यामुळे विविध संघटना आणि महिला मंडळांनी आरोपीला अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. गुन्हे करण्याची दोन्ही घटनांतील पद्धत एकसारखीच होती. त्यामुळे दै. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात 18 जूनच्या अंकात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा आरोपी एकच असावा, असा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरला.


गुन्ह्याची कबुली
गावातीलच संतोष नारायण कुकर (20, रा. खरोळा, ता. रेणापूर) हा फरार असल्याचे समोर आले. संतोषचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून तो शेळ्या चारतो. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून दोन्ही अत्याचारपीडित मुलींनीही त्याला ओळखले आहे.