आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:सोबत इतरांना सावरत घेतली ‘फीनिक्स’ भरारी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- तो दिवस आठवला की आकाशपाताळ एक झाल्याचा भास होतो.. डोकं गरगरायला लागतं आणि क्षणात सारं काही उद्ध्वस्त झाल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं..आभाळंच कोसळलं होतं. डोळ्यादेखत माणसं मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली. यातून जगले, वाचलेले जीव एकाकी पडले. अशा चिमुरड्यांना भारतीय जैन संघटनेने संकटातून बाहेर काढून थेट पुण्याला नेलं. पोरक्या झालेल्यांना, मायेचं आभाळंच फाटलेल्यांना आधार गवसला आणि या चिमुकल्यांनी ध्येयासाठी झपाटून शिक्षण घेत इतरांनाही मदतीचा हात देत पुढे नेण्याचं काम केलं. फीनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतलेले हे युवक आज स्वत:च्या गावी व इतरत्र चांगल्या दर्जाचं जीवन जगत आहेत.

भूकंपाची वार्ता मिळताच शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जैन संघटना तत्काळ आपत्ती निवारणाच्या कामी पोहोचली. गावे उद्ध्वस्त झालेली, घराघरात मृत्यूचं तांडव, लहान मुले दु:खाने विव्हळत भटकत होती. त्यांचे पुढे काय होणार, या विचाराने शांतीलाल मुथा अस्वस्थ झाले. त्यांनी तेथे उपस्थित असलेले मुख्यमंत्री शरद पवार यांना परिस्थिती सांगितली. संघटनेने दोन्ही जिल्ह्यांतील सास्तूर, होळी, होळी तांडा, राजेगाव, रेवीचिंचोली, तावशीगड, पेटसांगवी, नांदुर्गा, काटेचिंचोली ही आठ गावे दत्तक घेतली. राज्य सरकारच्या परवानगीने भूकंपग्रस्त भागातील मुलांना शिक्षणासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला. भूकंपग्रस्त गावांमधील सुमारे बाराशे मुले एसटी बसने पुण्याला रवाना केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने एका शाळेची इमारत या मुलांसाठी देऊन शिक्षणाची सोय केली.भारतीय जैन संघटनेने वाघोलीत स्वतंत्र शाळा बांधली. वाघोली (जि. पुणे) येथे जैन संघटनेने उभारलेल्या इमावाघोली एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर या नावाने सुरू झालेल्या संस्थेचे उद्घाटन नोव्हेंबर 1998 मध्ये झाले. संस्थेत आल्यानंतर सावरलेल्या भूकंपग्रस्त भागातील मुले सावरली. शैक्षणिक प्रगती करून आज स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत.