आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fir Against Mim Mla Akbaruddin Owaisi In Artdhapur

एमआयएम आमदार ओवेसींविरुद्ध अर्धापुरात गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- आंध्र प्रदेश विधानसभेतील एमआयएम पक्षाचे आमदार अकबरोद्दीन ओवेसींविरुद्ध सोमवारी अर्धापूर पोलिस ठाण्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ओवेसी यांनी 8 डिसेंबर 2011 रोजी अर्धापूर नगर पंचायत निवडणुकीत एमआयएम पक्षाचा प्रचार करताना धार्मिक भावना दुखावतील असे भाषण केले. या भाषणाची चित्रफीत यू ट्यूबवर आहे. हैदराबाद येथील मंगलहाट विभागाचे नगरसेवक पी.राजसिंघ लोध (34) यांनी 3 जानेवारी रोजी ही चित्रफीत यू ट्यूबवर पाहिली. 156 (3) कलमान्वये ओवेसीवर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका हैदराबाद येथील चिफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (सोळावे) यांच्या न्यायालयात दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने 11 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.