आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - Divya Marathi
पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद/लातूर- पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधात आज पहाटे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 
 
केवळ पेट्रोल दरवाढीवर एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संताप अनावर झालेल्या पाशा पटेल यांनी पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लातूर विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला. विशेष म्हणजे, ही घटना घडली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्यासह पत्रकार आणि काही शेतकरीही उपस्थित होते.
 
‘पेट्रोलची भाववाढ झाली, शहरात येण्यासाठीही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर पाशा पटेल भडकले आणि शिवीगाळ केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे. मला बसून प्रश्न विचारतो, औकात आहे का, असे बोलत पाशा पटेल यांनी प्रचंड शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे.
 
दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसून संबंधित व्यक्तीने माझा अपमान केल्याचा दावा पाशा पटेल यांनी केला आहे. ‘कार्यकर्त्याप्रमाणे तो माझ्याबरोबर बोलत होता. मी विचारलं, तुझे वय आहे का माझ्या वयाच्या व्यक्तीशी असे बोलण्याचे? त्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीत माझा पारा चढला आणि मग त्या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचे सांगितले’, असे पटेल म्हणाले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...