आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडातील मिलला आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - सिडको भागात असलेल्या एमआयडीसीमधील राघवेंद्र ऑइल मिलला गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता आग लागली. या आगीत जीवित हानी झाली नाही, मात्र वित्त हानी झाली. आग निश्चित कशामुळे लागली, हे कळू शकले नाही.

मिलचे मालक गिरीश चिद्रावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरेसा माल नसल्याने दोन दिवसांपासून मिल बंद होती. बुधवारी सायंकाळी शहरात वादळी वारे व तुरळक पाऊस आला. त्या वेळी विद्युत तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट झाले असावे. या आगीत जवळपास अडीच हजार क्विंटल सरकीची ढेप, १२०० क्विंटल सरकी, मिलमधील काही मशिनरी व इमारतीचा काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

अग्निशमन अधिकारी रईस पाशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग सकाळी साडेपाचच्या सुमाराला लागली. आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. त्या वेळी आगीने सर्व मिलला घेरले होते. अग्निशमन दलाचे २ बंब, २ पोर्टेबल बंब, १५ कर्मचार्‍यांनी आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या पथकाने मिलची सर्व यंत्रसामग्री, टँक आदी साहित्य आगीपासून वाचवले. सरकी व ढेपेची पोती मात्र जळून खाक झाली. आग कशाने लागली याचे निश्चित कारण सांगता येत नाही.

लातूर : शॉर्टसर्किटने बस खाक
मिनीबसवर शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने बस जळून खाक झाली. बुधवारी दुपारी आदर्श कॉलनीत ही घटना घडली. या प्रकरणाची शिवाजीनगर पोलिसांत गुरुवारी नोंद करण्यात आली आहे. आदर्श कॉलनीत जोसेफ परेरा यांचे घर आहे. घरासमोर त्यांनी त्यांची मिनीबस (एमएच २४ जे ५०२४) लावली होती. अग्निशमन दलाने आग विझविली. तथापि, गाडीचा कोळसा झाला होता.