आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यामध्ये दोन जिनिंगला आग, गेवराई, आष्टी तालुक्यात गाठी, यंत्रे खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी, गेवराई - बीड जिल्ह्यात मंगळवारी दोन जिनिंग-प्रेसिंगला आग लागून मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आष्टी तालुक्यातील पोखरी येथील जयदत्त जिनिंग- प्रेसिंग मिल आणि गेवराईजवळील बाग पिंपळगाव येथील मनजित जिनिंग येथे या घटना घडल्या.

पोखरी येथे जयदत्त िजनिंग व प्रेसिंगमध्ये साेमवारी रात्री प्रेसिंगचे काम सुरू होते. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कामगारांनी काम बंद केले. मंगळवारी पहाटे शॉर्टसर्किट होऊन अाग लागली. जामखेड ग्रामपंचायतीचा अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत प्रेसिंग मिलला अागीने वेढले होते. गोदामात चारशे गाठी होत्या. यंत्रसामग्री व गाठी असे एकूण सव्वाचार काेटी रुपयांचे नुकसान झाल्याचे जिनिंग मालक नवनाथ नागरगाेजे यांनी सांगितले. आष्टी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात अाली आहे.

गेवराईतही आग : बागपिंपळगाव येथील मनजित जिनिंगला मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आग लागल्याने शेडमध्ये ठेवलेला कापूस जळून खाक झाला. गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा झाला नव्हता. यातही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
(फोटो - प्रतिकात्मक)