आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम, गाेपीनाथगडावर कीर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
बीड - लाेकनेते गाेपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे अायाेजन केले असून लाडक्या नेत्याला विविध सामाजिक उपक्रमांतून अादरांजली वाहण्यात येणार अाहे.

लाेकसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवत भाजप सत्तारूढ झाला. अपेक्षेप्रमाणे जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा माजी उपमुख्यमंत्री यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. नेहमी जनमानसात वावरणारे गाेपीनाथ मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खाते अाल्याने अपेक्षा उंचावल्या. बीड व परळीच्या इतिहासात हा माेठा बहुमान हाेता. ३ जून २०१४ राेजी परळी येथे हाेणा-या नागरी सत्काराची तयारी सुरू झाली अाणि पहाटेच्या बातमीने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. मुंडे कुटुंबीयांवर अाभाळ काेसळले. सत्काराच्या हारांची प्रतीक्षा तशीच राहिली. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित जनसागराच्या भावना अनावर झाल्या हाेत्या. या दु:खावेगात मुलगी डाॅ. प्रीतम यांना बिनविराेध खासदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही. काँग्रेस पक्षाने मात्र उमेदवार दिला हाेता, तर काही महिन्यानंतर हाेणा-या विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मैदान सावरले. जनमानसात गाेपीनाथ मुंडे यांचे स्थान अबाधित असल्याची प्रचिती या दाै-यात अाली. केंद्र व राज्यस्तरावरील नेत्यांनाही दखल कायम राखावी लागली.

विधानसभा निवडणुकीत विजयानंतर पंकजांकडे जिल्ह्याचे पालकत्व अाले. वर्षभरात शासनाच्या विविध याेजनांच्या माध्यमातून विकासकामांचा संकल्प करत मूर्त स्वरूप देण्याचे काम सुरू अाहे. गाेपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असलेल्या परळी- बीड- नगर रेल्वेमार्गाला गती देण्याचे अाव्हान हाेते. हे अाव्हान स्वीकारत डाॅ. प्रीतम व पंकजा यांनी वेळाेवेळी पाठपुरावा केला. दिवंगत मुंडेंची लाेकप्रियता लक्षात घेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या प्रश्नावर मागील अाठवड्यातच प्रधान सचिवांशी चर्चा करून या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला. विकास चळवळीचे शिलेदार गाेपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे अाैचित्य साधत राज्य सरकारने १४३१ काेटी रुपयांची तरतूद नुकतीच केली. तितकाच वाटा केंद्राचा राहणार अाहे. रखडलेल्या मार्गाला गती मिळणार अाहे. दाेन्ही सरकारांनी अापल्या नेत्याबद्दल कृतज्ञता व अादरांजली व्यक्त केली अाहे.

मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम हाेत अाहेत. शासनाने राज्यात पर्यावरण सप्ताहाचे अायाेजन केले अाहे, तर बीड जिल्ह्यात ४ जूनपासून अाराेग्य सप्ताहाला प्रारंभ हाेत अाहे. पांगरी येथे गाेपीनाथगडावर भव्य कार्यक्रम हाेत असून रामायणाचार्य रामराव ढाेक महाराज यांचे कीर्तन हाेणार अाहे.

नेतृत्व पंकजांकडे
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यावरील वर्चस्व कायम राखले, तर जिल्हा बँक ताब्यात घेतली आहे. त्यांच्या या विजयामुळे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा यांनी सिद्ध केला आहे.
पुढे वाचा, अरे, ही आपलीच पोरं आहेत, थांबव गाडी!