आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी तालुक्यात एकाच कुटुंबातील पाच जणांना खिचडीतून झाली विषबाधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
अंबाजाेगाई - परळी तालुक्यातील येळंब येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. पाचही जणांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पाचही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

परळी तालुक्यातील येळंब येथील शेतकरी लक्ष्मण होळंबे यांचे कुटुंब गुरुवारी शेतात काम करून घरी परतले. घरी पत्नीने रात्री साडेसात वाजता स्वयंपाक केल्यानंतर लक्ष्मण होळंबे, पत्नी सुरेखा (३०), मुलगी मनीषा(१५), विजय (१०), ओमकेश (६) या पाच जणांनी जेवण केले. जेवणानंतर झोपण्याची तयारी करत असतानाच मळमळ हाेऊन जुलाब सुरू झाले. काही वेळाने अंग लुळे पडून ते बेशुद्ध पडले. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तोडगे काढण्यावर भर देण्यात आला. परिणामी, त्यांची प्रकृती गंभीर बनल्यानंतर ग्रामस्थांनी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात रात्री दोन वाजता उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर डॉक्टरांनी पाचही जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले.