आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर तालुक्यात पाच अनधिकृत शाळा; 11 वर्ग मान्यतेविनाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- शिक्षण विभागाची कसलीही मान्यता घेता तुळजापूर तालुक्यात पाच शाळा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात पालकांना शिक्षण विभागाने बजावले आहे. तसेच अन्य पाच शाळांमधील ११ वर्ग अनधिकृपणे सुरू आहेत. 

मागील काही वर्षांपासून शिक्षणाचे बाजारीकरण होण्याचा प्रकार वाढला आहे. यामध्ये काही संस्थाचालकांकडून सुरू करण्यात आलेल्या शाळांना मान्यताच घेण्यात आलेली नाही. मान्यता घेताच शाळा चालवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेत असताना अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने अशा शाळा शोधण्याची मोहीम काही वर्षांपासून सुरू केली आहे. मोठ्या जाहिराती करून आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी भाग पाडले जात आहे. आता शिक्षण विभागाकडून अशा शाळांची शोधमाेहीम सुरू करण्यात आली आहे. 

तुळजापूर तालुक्यात अशा पाच शाळा असल्याचे तपासणीत दिसून आल्या आहेत. यामध्ये जळकोट येथील छत्रपती इंग्लिश स्कूल, नंदगाव येथील बसवेश्वर इंग्लिश स्कूल, इटकळ येथील विवेक वर्धिनी विद्यालय, काटी येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, मुर्टा येथील सर्वाेदय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या शाळांना शिक्षण विभागाची मान्यताच नसल्याचे आढळून आले आहे. याच तालुक्यातील पाच अन्य शाळांतील वर्ग अनधिकृतपणे सुरू असल्याचीही बाब समाेर आली आहे. यामध्ये नळदुर्ग येथील लुकमन उर्दू प्राथमिक शाळा तसेच अणदूर येथील जिजाऊ इंग्लिश स्कूल या शाळांमधील सहावी सातवी, तुळजापूर येथील तुळजामाता इंग्लिश स्कूल मुक्तांगण इंग्लिश स्कूल येथील पाचवी ते सातवीचे वर्ग तसेच येथीलच लिटल फ्लॉवर्स इंग्लिश स्कूलमधील पाचवीचा वर्ग अनाधिकृत असल्याचे उघडकीस आल्याने पालकवर्गांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे.
 
असे होते नुकसान
अनधिकृतअसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले तर पुढील शिक्षणासाठी त्यांना अडचणी येऊ शकतात. कितीही चांगले मार्क पडले तरी पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रवेश मिळत नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्षे वाया जाण्याची शक्यता असते. यामुळे यासंदर्भात पालकांची दक्षता घेण्याची गरज आहे. 

इंग्रजी शाळांचा समावेश 
मागीलकाही वर्षांपासून इंग्रजी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ बाह्य देखावा चांगला करून विद्यार्थी पालकांना या शाळांकडे आकर्षित करण्यात येत आहे. मात्र, शैक्षणिक सेवांबाबत विशेष काळजी घेतली जात नाही. अशाच शाळा शिक्षण विभागाकडून परवानगी घेत नाहीत. जिल्ह्यात सर्वत्र अशी परिस्थिती आहे. 
 
तुळजापूर तालुक्यातशाळांची तपासणी केली असता अनधिकृत शाळा वर्ग समोर आले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये. यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात. 
- कल्याण सोनवणे, गटशिक्षणाधिकारी, तुळजापूर. 
बातम्या आणखी आहेत...