आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 विद्यार्थ्यांसह आठ पालकांना विषबाधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - उमरी तालुक्यातील गोरठा येथे शुक्रवारी सकाळी 32 विद्यार्थी व 8 पालकांना अन्नातून विषबाधा झाली. शासकीय अंगणवाडीत सकाळी 9 वाजता खाऊ वाटपात खीर बनवण्यात आली.

ही खीर अंगणवाडीत 32 विद्यार्थ्यांनी खाल्ली. काही विद्यार्थ्यांनी खीर घरी नेल्याने त्यांच्या पालकांनीही ती खाल्ली. एका पालकाने ती खीर गरम करण्याकरिता भांड्यात टाकली असता त्या खिरीत त्यांना पालीच्या शेपटाचा भाग आढळला. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्याचा त्रास सुरू झाला. उपसरपंच भारत साळवे, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी तत्काळ वाहनाची व्यवस्था करून विषबाधा झालेल्यांना उमरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने उपचार केले. अंगणवाडीत खाऊ शिजवण्याचे काम बचत गटातर्फे केले जाते. या प्रकरणी दोषीवर कारवाई केली जाईल, असे पंचायत समिती सभापती शिवाजी देशमुख यांनी सांगितले.