आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना माफक दरात भोजन; लातुरात उपक्रम; शेतकऱ्यांसाठी लवकरच सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. - Divya Marathi
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते.
लातूर- लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरातील भोजनगृह उभारले जाणार आहे. या भोजन कक्ष उभारणीच्या कामाचा प्रारंभ गुरुवारी समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला.  

लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे माल खरेदी व विक्री करण्यासाठी येथे लातूरसह शेजारील नांदेड, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि बिदर जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांची ये-जा असते. माल विक्री करण्यासाठी शेतकरी मोठया संख्येने बाजार समितीच्या परिसरात येतात. त्यांना बराच काळ थांबावे लागते. त्यावेळी जेवणासाठी त्यांचा मोठा खर्च होतो. हा खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पोटभर जेवण मिळावे, यासाठी बाजार समितीने हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या परिसरात हा भोजन कक्ष उभारला जाणार असून येथे शेतकऱ्यांना  कमी दरात पोटभर जेवण मिळणार आहे. या कार्यक्रमास उपसभापती मनोज पाटील, सचिव मधुकर गुंजकर यांच्यासह संचालक माजी आ. वैजनाथदादा शिंदे, विक्रम शिंदे, सुधीर गोजमगुंडे, तुकाराम आडे, तात्यासाहेब बेद्रे, गोविंद नरहरे, हनमंतराव खंदाडे, विष्णू मोहिते, हर्षवर्धन सवई, नगरसेवक अजय दुडीले यांच्यासह बाजार समिती कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
नवीन वर्षात सुविधा मिळणार
नवीन वर्षात शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या भोजन कक्षाच्या उभारणी कामाचा शुभारंभ सभापती ललितभाई  शहा यांच्या हस्ते   झाला. विशेष म्हणजे असा उपक्रम राबवणारी लातूर बाजार समिती मराठवाड्यातील मोठ्या बाजार समितींमध्ये एकमेव ठरली आहे. 
बातम्या आणखी आहेत...