आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुसाठी पत्नीचा निर्घृण खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - मी आणलेली दारूची बाटली कुठे ठेवली आहे, असे विचारत पतीने पत्नीच्या डोक्यात सपासप वार करून तिचा खून केल्याची घटना आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे घडली. घटनेनंतर पती फरार झाला आहे.

अहमदनगर सरहद्दीवरील मराठवाडी गावात बाबासाहेब रावसाहेब जाधव यांची वीटभट्टी असून या ठिकाणी मजूर म्हणून सुरेश अर्जुन निकम (३५) व लीलाबाई सुरेश निकम (३२) हे पती-पत्नी व मुलगी दीपाली हे कुटुंब राहते. शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरेश निकम याने पत्नी लीलाबाईला घरी आणलेली दारूची बाटली कुठे लपवून ठेवली आहेस, ती माझ्याकडे दे असे सांगितले. त्या वेळी पत्नी लीलाबाईने बाटली देण्यास विरोध केला. मी तुला बाटली देणारच नाही, असे म्हणताच सुरेशने रागाच्या भरात कोयत्याने पत्नीच्या डोक्यात, तोंडावर वार केले. यात लीलाबाईचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सुरेश याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर वीटभट्टीमालक बाळासाहेब जाधव यांच्या माहितीवरून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.