आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वनपरिक्षेत्रपालांना भाेवणार हलगर्जीपणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी झेड. एन. फारुकी, अजिंठ्याचे डी. एम. पवार, सोयगावचे विजय सूर्यवंशी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विपिन इटणकर यांनी दिले.

तालुक्यातील दुष्काळी व टंचाईची परिस्थिती हाताळण्यासाठी सोमवारी (दि. २) उपविभागीय अधिकारी इटणकरांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार समिती व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. दुष्काळाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकांना वन विभागाचे वनक्षेत्रपाल फारुकी सातत्याने गैरहजर राहत असून संपर्क ठेवत नाहीत. दुष्काळ निवारणाच्या कामातील सहभाग स्पष्ट होत नसल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश इटणकरांनी दिले. यापूर्वी योजनेत समाविष्ट असलेल्या २८ गावांमध्ये पं.स. व कृषी विभागाच्या माध्यमातून विहीर पुनर्भरण व गाळ काढण्याची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर संबंधित समितीच्या वतीने विकासकामांची पाहणी करण्यात आली .

डोंगरगावसाठी पाणी
बैठकीनंतर सिल्लोड नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून डोंगरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ इटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार, संतोष गोरड, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, प्रभाकर पालोदकर, डोंगरगावचे सरपंच उमरखॉ पठाण, निजाम पठाण उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...