आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्रे, एचडीएफसी बँकेला लाखो रूपयांचा गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद : नोकरीला असल्याचे सांगून त्याबाबतची बनावट कागदपत्रे, पगारपत्रक तसेच इतर कागदांची जुळवाजुळव करून एचडीएफसी बँकेच्या उस्मानाबाद शाखेतून २४ लाख ३५,९४३ रुपयांचे वैयक्तिक कर्ज उचलणाऱ्या ७ महाठगांवर आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी बँकेचे उपसरव्यवस्थापक श्रीराम हिरेमठ (सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी दादासाहेब शिंदे (रा. पिरळे, ता. माळशिरस), अनिल कांदे (रा. बोरगाव खुर्द, ता. बार्शी), सोमनाथ शिंदे (रा. पिरळे), जयहरी देशमुख (रा. देवळाली, हल्ली चौघेही रा. उस्मानाबाद), खंडोजी काळे (रा. राळेरास, ता. बार्शी), अनिल अडसुळे (मारवाडी गल्ली, उस्मानाबाद), योगेश भोसले (विकासनगर)
हे सर्व जण आपणे शाळेत नोकरीस असल्याचे सांगून त्यांनी एचडीएफसी बँकेच्या उस्मानाबाद शाखेत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला. बनावट कागदपत्रे, पगारपत्रक, बँकेचे खोटे स्टेटमेंट जोडून ते खरे असल्याचे भासवून २४ लाख ३५ हजार ९४३ रुपयांचे वैयक्तिक कर्ज उचलले.
बातम्या आणखी आहेत...