आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्य न्यायमूर्ती देशपांडे यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अंबाजोगाई - मुंबई हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती व्यंकटराव श्रीनिवास देशपांडे (92) यांचे पुणे येथे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
हैदराबाद येथे शिक्षण घेतल्यानंतर अंबाजोगाईत त्यांनी काही काळ अध्यापनाचे कार्य केले. हैदराबादेत वकिली आणि नंतर 1967 मध्ये मुंबईत ते न्यायमूर्ती झाले. 1982 मध्ये ते मुख्य न्यायमूर्ती झाले. 1988 मध्ये ते लोकायुक्त होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा विधानभवनात बसवणे, नागपूर कराराचा आधार घेऊन औरंगाबाद येथे स्वतंत्र खंडपीठाची स्थापना अशा कामात त्यांनी पुढाकार घेतला होता. 1988 मध्ये त्यांची राज्याच्या लोकायुक्तपदीही नियुक्ती झाली.