आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंडा येथील माजी आमदार चंदनसिंह सद्दीवाल यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार चंदनसिंह सद्दीवाल (८९) यांचे सोमवारी (दि.१२) सायंकाळी पुणे येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
सद्दीवाल हे परंडा नगर परिषदेचे १९६८ मध्ये नगराध्यक्ष झाले. त्यानंतर १९७४ मध्ये थेट जनतेमधून नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. या कालावधीत शहरासाठी पहिली पाणीपुरवठा योजना १९७२ मध्ये पूर्ण करून परंड्यासाठी पाण्याची सोय केली. तालुक्यात त्यांची काका म्हणून ओळख होती.
सलग १५ वर्षे नगराध्यक्ष राहिल्यानंतर १९८० मध्ये काँगेसकडून परंडा-भूम मतदारसंघातून ते आमदार झाले. या काळात ते १९८२ मध्ये ते रोजगार हमी योजनेच्या समितीचे राज्याध्यक्ष होते. त्यांच्या काळात परंडा ते करमाळा व कुर्डूवाडी मार्गावरील सीनानदीवरील पुलाचे काम करण्यात आले. यामुळे दळणवळणाची सुविधा झाली. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले. माजी आमदार चंदनसिंह सद्दीवाल यांच्या निधनाने परंड्यासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...