आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Vice Chancellor Dr. Ali Akbar Khan In Latur

सीएंना ग्रामीण भागात सेवा अनिवार्य करा, डॉ. अकबर अली खान यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- स्थानिक स्वराज्य संस्थांचे होत असलेले बळकटीकरण व ग्रामविकासावर सरकार करत असलेली मोठी आर्थिक गुंतवणूक योग्य कारणी होते का, हे पाहणे गरजेचे झाले असून त्यासाठी आयसीएआयने नवीन सी. ए. झालेल्यांना वैद्यकीय सेवेच्या धर्तीवर ग्रामीण भागात एक वर्ष सेवा देणे अनिवार्य करावे, असे प्रतिपादन तेलंगण विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा उस्मानिया विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे विद्यमान अधिष्ठाता डाॅ. अकबर अली खान यांनी येथे केले.
राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘सी.ए. व्यवसायातील आव्हाने व संधी’ या िवषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद‌्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डाॅ. गोपाळराव पाटील होते. आय.सी.ए.आय. वेस्टर्न रिजन मुंबईचे अध्यक्ष सी.ए. अनिल भंडारी, कॅनरा बँकेचे संचालक सी.ए. सुनील कोटेचा, प्राचार्य एस. बी. जाधव, डाॅ. ए. जे राजू, डाॅ. पी. एन. सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. खान म्हणाले, पंतप्रधान मोदींमुळे मोठी परकीय गुंतवणूक भारतात येत आहे. आर्थिक िवकास गतीने साधण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. अशा अवस्थेत प्रशासन व उद्योग-व्यवसायातील पारदर्शकता राहणे आवश्यक असून सेवेतील भ्रष्ट कार्यपद्धतीला बांध घालणे गरजेचे आहे. त्यासाठी सी.ए. महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थविश्वात जागतिकीकरणाने होत असलेला कायापालट व येत असलेल्या जबाबदाऱ्या, वेगवेगळे घोटाळे अशा भोवतालात सी.ए. चे महत्त्व अन‌् जबाबदाऱ्यांत वाढ झाली आहे. गुणवत्ता व लिखाण कौशल्यामुळे जगभरातून भारतीय सी.ए. ना मागणी आहे. २०३० पर्यंत प्रतिवर्षी साडेसात ते दहा हजार सी.एं. ची आवश्यकता देशाला भासणार अाहे. तथापि, देशात एकूण मागणीच्या दहा टक्केही चार्टर्ड अकाउंटंट आपण िनर्माण करू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

त्रिसूत्रीचा अंगीकार करा
सी. ए. अनिल भंडारी यांनी विचारातील सुस्पष्टता, कष्ट, प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीचा अंगीकार करून यशोशिखर गाठता येते हे उदाहरणासह पटवून दिले. डाॅ. पाटील, डाॅ. सगर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.