आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - आजोबासोबत शेताकडे निघालेल्या चार चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अर्धापूरपासून जवळच असलेल्या कामठा येथील विजय बुद्धघोष गव्हाणे (सात), सम्मय नागेश गव्हाणे (पाच) व शीला शेषराव कोलते (चार), प्रज्ञा शेषराव कोलते (पाच) हे चौघे आजोबा तुकाराम गव्हाणे यांच्यासोबत शेताकडे गेले. कामठा येथील नाल्यात तोल जाऊन मुले पाण्यात पडली आणि बुडाली.