आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांत विजा कोसळून चौघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना / उस्मानाबाद - जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत विजा कोसळून चौघांचा मृत्यू झाला. दोन महिलांसह अन्य दोघांचा मृतांत समावेश आहे.

भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप शिवारात शेतातील कामे आटोपून घराकडे परत येताना अंगावर वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, तर एक मुलगा जखमी झाला. बुधवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. सत्यशीला अशोक सहाणे (25), गंगासागर त्र्यंबक सहाणे (18) अशी मृत महिलांची नावे आहेत. अनिल नारायण सहाणे (13) भाजून गंभीर जखमी झाला.

वाशी तालुक्यातील सारोळा (मां.) येथे वीज पडून एक ठार, तर एक जण जखमी झाला आहे. बाळासाहेब अंकुश मोरे (42, रा. सारोळा) असे मृताचे नाव आहे, तर अशोक बापूराव दराडे (23, रा. सारोळा) हे गंभीर जखमी झाले.

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथे एका शेतकर्‍याचा झाडाखाली थांबल्यानंतर वीज पडून मृत्यू झाला. व्यंकट रामकिसन फेरे (40) असे मृताचे नाव आहे.