आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीत ७४ हजारांचा ऐवज पळवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - कीर्तन ऐकण्यासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात शिरून ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. देवणी तालुक्यातील तोगरी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. बालाजी मोतीपवळे व त्यांचे कुटुंबीय गावातील मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील ४० हजार रुपये, टीव्ही, मोबाइल व रोड मॅप असा एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
बातम्या आणखी आहेत...