आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार लाख भाविकांचा तुळजाई दर्शन घेऊन चैत्र पौर्णिमेचा खेटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- हलगीच्या तालावर वाजत-गाजत ४ लाख भाविकांनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन चैत्र पौर्णिमेचा खेटा पूर्ण केला. तुळजाभवानी परिसर, महाद्वार परिसर भाविकांनी गजबजला होता. दर्शन मंडप मंगळवारी (दि. ११) पहाटेपासून भाविकांनी खचाखच भरला होता. दरम्यान, दुपारी तुळजाभवानी मंदिरातून बाहेर पडण्याचा मातंगी मंदिरासमोरील एकमेव अरुंद मार्गावर भाविकांची गर्दी वाढल्याने रेटारेटी झाली. सुदैवाने दुर्घटना टळली.    

तुळजाभवानीची वर्षातील दुसरी सर्वात मोठी यात्रा चैत्र पौर्णिमा यात्रा मंगळवारी भाविकांनी उन्हाची पर्वा न करता तुळजाभवानी दरबारात प्रचंड हजेरी लावली. दिवसभर भाविकांचा ओघ कायम होता. महाद्वार परिसर, बाजारपेठ भाविकांनी गजबजली होती.  

मंगळवारी पहाटेच अभिषेक पूजेची रांग अभिषेक हॉल प्रांगण भरून आराधवाडीमार्गे भारतीबुवा मठापर्यंत गेली होती. मंदिरातील गोमुख तीर्थ व कल्लोळ तीर्थावर अंघोळीसाठी भल्या पहाटे भाविकांनी गर्दी केली होती. अंघोळीच्या रांगा नागझरी कुंडापर्यंत गेल्या होत्या. मंगळवारी रात्री ११ वाजता तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. छबिना मिरवणुकीने चैत्र पौर्णिमा यात्रेची सांगता झाली. तत्पूर्वी सायंकाळी ७ वाजता देवीच्या अभिषेक पूजेस प्रारंभ होऊन रात्री ९ पर्यंत अभिषेक पूजा संपवण्यात आली. या वेळी लाखो भाविक होते.

येरमाळा- येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला मंगळवारपासून (दि.११) प्रारंभ झाला असून येरमाळा पावन नगरीत चार लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी (दि.१२) चुना वेचण्याच्या मुख्य  कार्यक्रमासाठी मंगळवारी रात्रभर भाविकांचा लोंढा येथे दाखल होणार आहे. देवीच्या दोन पौर्णिमा येत असल्याने भाविक मोठ्या संख्येने दोन दिवसांपूर्वीच येरमाळ्यात दाखल झाले आहेत. मंगळवारी मंदिरातील छबिना व पौर्णिमेनिमित्त भाविकांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.
बातम्या आणखी आहेत...