आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगाव शहरात चिमुकलीवर वृद्धाचा लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल, वृद्ध फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - येथील एका साडेचार वर्षीय चिमुकलीला बोराचे आमिष दाखवून ७० वर्षीय वृद्धाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना रविवारी (३ जानेवारी) घडली. याप्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात साेमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तू तुळशीराम चौधरी असे चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे.

सोयगाव शहरातील चौधरीगल्ली येथील दत्तू चौधरीने घराजवळ खेळत असलेल्या एका चिमुकलीला तुला खायला बोरे देतो म्हणून घरात बोलावून घेतले . त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलगी रडत असल्याने हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला.
पीडित चिमुकलीच्या आईने सोयगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्तू तुळशीराम चौधरीविरुद्ध ३७६ (२)(१), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ कलम ३ व ४ तसेच अॅट्राॅसिटी अॅक्ट (३) (२) (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तू चौधरी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुजित बडे, वाघ, अविनाश बनसोड आदी पुढील तपास करत आहेत.