आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

77 लाखांना गंडा, दोन आरोपी अटकेत; एलसीबीची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- पैसे दामदुप्पट करून देतो असे आमिष दाखवून जवळपास ७७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली. सोमवारी दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायाधीश (तिसरे) यांच्या न्यायालयाने दि. पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दोन आरोपीपैकी एक जण स्थानिक रहिवासी असून दुसरा आरोपी जळगावचा आहे. या दोघांचीही नाशिक येथे गेल्या वर्षी भेट दिली. फाँरेन करन्सीची आँनलाईन ट्रेडिंग करण्याच्या व्यवसायात या दोघांनीही एफ एक्स नावाची कंपनी उघडली. ग्राहकाने जेवढी रक्कम गुंतविली त्याच्या वीस, तीस टक्के रक्कम प्रति महिन्याला परतावा म्हणून मिळेल. नंतर ही रक्कम दुप्पट होईल, अशी आश्वासने त्यांनी लोकांना दिली. त्यांनी पहिले काही महिने परतावाही दिला. पैसेे मिळत आहेत असे पाहून अनेक लोकांनी या कंपनीत रक्कम गुंतविली. ७६ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम गुंतल्यानंतर एक वर्षापूर्वी दोघांनीही पोबारा केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांच्या पथकाने या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपीच्या बँक खात्यात सहा कोटी रुपयाची उलाढाल झाल्याचे पोलिस तपासात आढळून आले.

गुंतवणूकदार वाढण्याची शक्यता
एस.एस. वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी किती लोकांना फसविले याचा तपास सुरू आहे. त्यांना अटक झाल्यानंतर या कंपनीत गुंतवणूक केलेले आणखी काही गुंतवणुकदार समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील फसवणुकीची रक्कम अजून वाढण्याची शक्यता आहे.