आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुजाऱ्यांच्या वेशात भाविक गाभाऱ्यात, तुळजाभवानीचे दर्शन देण्यासाठी बनवाबनवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - तुळजाभवानीच्या मंदिरात काही पुजारी व सेवेकरी भाविकांनाच धोतर, पंचा व बनियान असा पुजाऱ्यांचा वेश घालून थेट गाभाऱ्यात दर्शनासाठी घेऊन जात आहेत. अशा व्यक्तींची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.

डाॅ. नारनवरे यांनी २६ मे रोजी यासंदर्भात आदेश काढला आहे. तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांचे साेंग घेणाऱ्यांविरोधात फौजदारी संहितेच्या कलम १०९ प्रमाणे कारवाईची शक्यता पडताळून पाहावी, असे निर्देश दिले आहेत.

मंदिरात बनावट पुजाऱ्यांकडून भक्तांना फसवण्याची दखल घेऊन डॉ. नारनवरे यांनी पुजाऱ्यांना ड्रेसकोड सक्तीचा केला. याची अंमलबजावणी गतवर्षी गणेश चतुर्थीपासून करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पुजारी व्यवसायाला शिस्त लागली. मात्र, काही पुजारी व सेवेकरी सुरक्षा रक्षकांशी संगनमत करून भाविकांनाच पुजारी असल्याचे भासवून थेट गाभाऱ्यात नेण्याचे प्रकार घडत आहेत.

रांगेत ताटकळणाऱ्या भाविकांवर अन्याय
तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक तुळजापुरात येतात. त्यामुळे साहजिकच दर्शन मंडप खचाखच भरून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. परंतु, काही पुजारी धनदांडग्या भाविकांना थेट दर्शनाचे आमिष दाखवून वेगळा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांवर अन्याय होत आहे.
बातम्या आणखी आहेत...