आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त ३८५ शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- सततच्या दुष्काळामुळे नापिकी अाणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अात्महत्या केलेल्या जिल्ह्यातील ३८५ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अागामी खरीप हंगामात दिलासा देण्यासाठी बियाणे कंपनी कृषी विक्रेत्यांनी मदतीचा हात पुढे केला अाहे. या शेतकरी कुटुंबांना कपाशीच्या तीन बाजरीची एक बॅग माेफत वाटप करण्यात येणार अाहे.

चार वर्षांपासून बीड जिल्हा दुष्काळाशी सामना करत अाहे. मागील वर्षीचे दाेन्ही हंगाम दुष्काळामुळे वाया गेले. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला- मुलींचे शिक्षण, लग्नाच्या चिंतेत हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अात्महत्येला कवटाळले. उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य अाणि राज्याबाहेरून अनेक संस्था, संघटना, सेलिब्रिटीज पुढे अाले.

दुष्काळजन्य स्थितीमुळे अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला यापुढेही धीराने शेती करता यावी म्हणून दिल्ली येथील अाॅल इंडिया अॅग्राे इनपूट डिलर्स असाेसिएशनने पुढाकार घेतला. बीड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता असाेसिएशनने बियाणे कंपन्यांचे क्षेत्रीय व्यवस्थापक शैलेश त्यागी, सानप, मगर यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. हैदराबाद येथील श्रीराम बायाेसीड‌्स, जेनेटिक इंडिया, जालना येथील कलश सीड‌्स अाणि यू. एस. अॅग्री या तीन कंपन्यांनी कपाशी बियाणे उपलब्ध करून दिले. त्याचबराेबर हैदराबाद येथील यशाेदा सीड्स कंपनीने बाजरी बियाणे उपलब्ध करून दिले.

जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांना भेटून कृषी विक्रेत्यांनी प्रशासकीय पातळीवर सहकार्य मागितले. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या उपक्रमाचे स्वागत करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने यांना सूचना केल्या. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या यादीनुसार अात्महत्या केलेल्या ३८५ शेतकरी कुटुंबांना साेमवारपासून तीन बॅग कपाशी एक बॅग बाजरी बियाण्यांचे वाटप करण्यात येणार अाहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे खचलेले शेतकऱ्यांचे मनाेबल उंचावण्यासाठी धीर देण्यासाठी सामाजिक दायित्व पार पाडावे म्हणून कृषी विक्रेता असाेसिएशनने कंपन्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला अाहे. उपक्रमाची अाठ दिवसांपासून तयारी केली. बियाणे कंपन्यांनीही काेणतेही अाढेवेढे घेता मदतीला हाेकार दिल्याचे जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी सत्यनारायण कासट यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमाेद निनाळ, सुनील बागमार, जयप्रकाश बियाणी, राजू डाेंगरे, अंगद नवले, विवेक पिंगळे तसेच अन्य कृषी विक्रेते परिश्रम घेत अाहेत.

पाच केंद्रांवर वाटप : परळी,अंबाजाेगाई, माजलगाव तालुक्यांसाठी माजलगाव येथे अादर्श अॅग्राे एजन्सी, केज, धारूर तालुक्यांसाठी साई कृषी सेवा केंद्र, अाष्टी तालुक्यासाठी कडा येथील किसान कृषी भांडार तसेच गेवराई, शिरूर, बीड, वडवणी पाटाेदा तालुक्यांसाठी बीड येथील वसुंधरा अॅग्राे एजन्सी या केंद्रांवर बियाणे वाटप हाेणार अाहे.

अात्महत्या करू नका
> शेतकऱ्यांनाे घाबरू नका, पीक विमा काढा आणि निश्चिंत राहा, पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मिळेल. त्यामुळे काेणीही अात्महत्या करू नये अाम्ही शेतकरी बांधवांसाेबत अाहाेत.
- मनमाेहन कलंत्री, अध्यक्ष, अाॅल इंडिया कृषी विक्रेता असाेसिएशन, दिल्ली.

दहा लाखांचे बियाणे
तीनबॅग कपाशीच्या अाणि एक बॅग बाजरीची अशा एकूण २७०० रुपयांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येणार अाहे. ३८५ शेतकरी कुटुंबांना एकूण दहा लाख ३९ हजार ५०० रुपयांचे बियाणे माेफत वाटप हाेणार अाहे. हे बियाणे एका लाभार्थ्याला साधारण तीन एकरात वापरता येणार अाहे.

कुपन घरपाेच
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त यादीनुसार कृषी असाेसिएशनने माेफत बियाण्यांचे कुपन बनविले असून ते तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कृषी सहायकांमार्फत संबंधित शेतकरी कुटुंबापर्यंत घरपाेच केले जाणार अाहे. हे कुपन घेऊन संबंधित केंद्रावरून बियाणे न्यावयाचे अाहे.
बातम्या आणखी आहेत...