आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fraud In Latur, Four Arrested News In Divyamarathi

दामदुपटीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या चौघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- अवघ्या अठरा महिन्यांत दामदुप्पट करून देतो म्हणून शेकडो लोकांना सुमारे ९० लाखांना गंडा, चौघांना चाकूर पोलिसांनी सोमवारी अटक केली. फसवणूक झालेले सर्व जन चाकूर येथील असून याप्रकरणी चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरजाना शौकतअली सय्यद, नौशाद सय्यद, बिलाल पठाण व सलीम पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून शेकडो मजूर महिलांना गंडा घातला. चार वर्षांपासून त्यांचा हा धंदा सुरू होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी फसगत झालेल्यांनी चाकूर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी हुसेन रज्जाकसाब शेख यांनी फिर्याद दिल्यानंतर अटक झालेल्या चौघांसह शौकतअली दस्तगीर सय्यद, दस्तगीर सय्यद आदी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे गुंतवणूक करणारे अशिक्षित व मजुरी करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही योजना असून, मुलांच्या वसतिगृहासाठी ती राबवण्यात येत असल्याचे थाप मारून लोकांची फसवणूक करण्यात आली. सात हजार ५००, ५२ हजार ५०० व एक लाख ५ हजार अशा स्वरूपात ही गुंतवणूक करून घेण्यात आली. सुरुवातीला काही जणांना दामदुप्पट रक्कम देण्यात आली. त्यामुळे विश्वास वाढला व गुंतवणूकही वाढली.

चार महिन्यांपूर्वीच भांडाफोड -सदर योजना फसवणारी असल्याचा भांडाफोड चार महिन्यांपूर्वीच झाला होता. त्या वेळी मुख्य आरोपी फरजाना हीने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. परंतु गुंतवणूकदार आक्रमक झाल्यानंतर पंचासमोर सासूच्या नावावरील मालमत्ता विकून पैसे परत करण्याचे बांॅडवर लिहून दिले होते. परंतु मुदतीनंतरही रक्कम न मिळाल्याने गुंतवणूकदारांना पोलिसांत धाव घ्यावी लागली.
साध्या कागदावर हिशेब
गुंतवणूकदारांनी रक्कम दिल्याची नोंद साध्या कागदावर घेण्यात येत होती, त्यावर तारीखही नसे. शिवाय त्यांना पावती किंवा पासबुकही देण्यात येत नव्हते. काही जणांना अॅक्सिस बँकेचे धनादेश देण्यात आले होते.