आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्ड पाणंदमुक्त झाला तरच मिळणार निधी, अभियानाच्या सचिव स्मिता झगडे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबात स्वच्छतागृह देण्यासाठी तसेच वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. देशभरातून ३५० जिल्हे पाणंदमुक्तीसाठी घेण्यात आले असून, जालन्याचाही यात समावेश आहे. १३ तेरा हजार उद्दिष्ट असलेल्या जालन्याने केवळ २ हजार कुटुंबामध्येच स्वच्छतागृह केले आहेत.
 
३१ मार्चपर्यंत अजून ११ हजार स्वच्छतागृह बांधून घेण्यासाठी सदस्यांनीही प्रयत्न करावेत. वॉर्ड पाणंदमुक्त असेल तर विविध विकास कामांना निधी मिळणार असल्याची माहिती स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या सचिव स्मिता झगडे यांनी दिली.   
 
जालना शहरातील टाऊन हॉल परिसरात स्मिता झगडे यांनी पाणंदमुक्तीचा आढावा घेतला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी मंचावर माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची उपस्थिती होती. शहरात पंधरा दिवसांपूर्वी आढावा घेतला असता, उघड्यावर शौचास जाणारे ४२ ठिकाणे आहेत. येथे गुडमॉर्निंग पथकाने  कारवाई करावी नगरसेवकांनीही  वॉर्ड पाणंदमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.   
 
 
बातम्या आणखी आहेत...