आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान इंद्रजित सोळंकेवर अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - तालुक्यातील अंजनडोह येथील जवान इंद्रजित सोळंके यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नगर येथील सैन्यदलाच्या तुकडीने तीन वेळा हवेत फैरी झाडून मानवंदना दिली.

अंजनडोह येथील सैन्यदलातील जवान इंद्रजित शत्रुघ्न सोळंके यांना आजारपणामुळे सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री सोळंके यांचे निधन निधन झाले. तब्बल पाच दिवसांनंतर इंद्रजित सोळंके यांचे पार्थिव सुरुवातीला धारूर ग्रामीण रुग्णालयात रविवारी पहाटे आणण्यात आले. सकाळी सोळंके यांच्या घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.

त्यात ग्रामस्थ सहभागी झाले. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सोळंके यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
करण्यात आले.

या वेळी भाजपचे आमदार आर. टी. देशमुख, तहसीलदार राजाभाऊ कदम, सैनिकी अधिकारी कॅ. सुभाष डोरस्कर, नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, जयसिंह सोळंके, गजानन तडसे, नायब सुभेदार मिनी मुक्तूर, पत्रकार अनिल महाजन, कॅ. वचिष्ठ साखरे,ले. तिपाले, कॅ. अप्पाराव मुंडे, विश्वनाथ मुंडे, परमेश्वर तिडके,भास्कर आदमाने, माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष दत्ता शिनगारे, नगरसेवक बालाजी चव्हाण, नामदेव भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली
बातम्या आणखी आहेत...