आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गजानन महाराज पालखीचे कळंबमध्ये स्वागत; वारकर्‍यांचा उत्साह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब -‘गण गण गणात बोते’ च्या गजरात विदर्भातील गजानन महाराज यांच्या पालखीचे कळंब शहरात गुरुवारी आगमन झाले. शहरातील भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले.

शेगाव (जि. बुलडाणा) येथील गजानन महाराज यांच्या पालखीचा कळंब येथून जिल्ह्यात प्रवेश झाला. पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी दुपारपासूनच गर्दी केली होती. ‘टाळ मृदंगाच्या तालावर अभंगाच्या स्वरात वारकरी दंग झाले होते. नगराध्यक्ष शिवाजी कापसे, नगरसेवक सुनील गायकवाड, अनंत वाघमारे, हर्षद अंबुरे, शंकर वाघमारे, दिनकर काळे, दत्तात्रय तनपुरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी दर्शन घेऊन पालखीचे स्वागत केले. 5 मे 2014 रोजी शेगाव येथून पालखी मार्गस्थ झाली आहे. 26 जून रोजी पालखीचा कळंब येथे 21 वा मुक्काम आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानात पालखी भाविकांना दर्शन घेण्यासाठी थांबली आहे. शुक्रवारी सकाळी ढोकी मार्गे मार्गस्थ होणार आहे. यावर्षी दिंडीत 625 वारकरी सहभागी झाले आहेत. या पालखीच्या सुरक्षेसाठी 20 सुरक्षारक्षक आहेत. तसेच शहरातील पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

गजराजाविना पालखी
गजानन महाराज यांच्या पालखीचे हे 47 वे वर्ष आहे. या पालखीचे मुख्य आकर्षण असलेल्या गजराजाचा मृत्यू झाला आहे. 46 वर्षे वारी केलेल्या गजराजाशिवाय ही पालखी निघाली आहे.