आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाचे जंगी स्वागत, दुष्काळी विघ्न दूर कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- गेल्या वर्षीच्या तुलनेत पीकपाणी चांगले असल्यामुळे यंदा लातूर जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. सकाळपासून घरोघरी आणि दुपारनंतर सार्वजनिक मंडळांकडून गणेशाची स्थापना करण्यात आली.

गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे गणेशोत्सवातील उत्साह कमी होता. यंदा मात्र तुलनेत पिकांसाठी चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या उत्साही वातावरणात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. दोन दिवसांपासून बाजारपेठही सजली असून ठिकठिकाणी गणेशमूर्तींच्या विक्रीची दालने सुरू झाली आहेत.

रविवारी दिवसभर गणरायाच्या आगमनाची तयारी झाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच बच्चे कंपनीची गणेशाला घरी घेऊन येण्यासाठी लगबग सुरू होती. बहुतांश घरांमध्ये दुपारपर्यंत गणेश स्थापना करून पूजन करण्यात आले. लातूर जिल्ह्यात हजार सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. पोलिसांनी दुपारपर्यंत १८०० गणेश मंडळांना परवानग्या दिल्या.
परभणीत गणरायाचे जल्लोषात आगमन झाले.

पावसाच्या हलक्या सरीसंगे गणपती माझा नाचत अाला
बीड शहरात रात्री ८.३० वाजता पावसाच्या हलक्या सरींनी गणरायाचे स्वागत केले. साेमवारी दिवसभर बीड शहरातील विविध मार्गावरून मुलांनी तर रात्री उिशरापर्यंत माेठ्या गणेश मंडळांनी मूर्तीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. िसध्दीिवनायक व्यापारी संकुलाच्या परिसरात सकाळपासूनच स्वागतासाठी गणेश भक्त जमले होते.

साडेचार हजारांवर शाडूचे गणपती
जालना।ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी लाडक्या गणरायाचे आगमन जल्लोषात झाले. मिरवणुकीत तल्लीन होवून बाप्पाचे स्वागत करण्यात आले. ‘दिव्य मराठी’ने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत व्यापक जनजागृती केल्याने शाडू मातीच्या गणेशमूर्तींना चांगलीच पसंती मिळाली. शहरातील विविध शाळा, हरित सेना तसेच कारागिरांनी तयार केलेल्या या मूर्तींची हातोहात विक्री झाली. विसर्जनाच्या वेळी या मूर्ती सहज विरघळतात. तसेच घरच्या घरीसुद्धा विसर्जन करणे शक्य होते. यामुळे साडेचारांवर हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

ढोल-ताशांचा गजर, गणराय विराजमान
गणपती माझा नाचत आला... लाडक्या बाप्पाचे थाटात आगमन झाले. सोमवारी सकाळपासून बाप्पाच्या आगमनासाठी गणेश मंडळांनी जोरदार तयारी केली होती. नांदेडमध्ये ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
मराठवाड्यात लाडक्या गणरायाचे वाजतगाजत आगमन झाले. सततच्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला यंदा पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. यंदा तरी दुष्काळाच्या या फेऱ्यातून निर्विघ्न बाहेर काढ, असे साकडेच बाप्पाला घातले.
बातम्या आणखी आहेत...