आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाक कार्यालयाद्वारे मिळणार गंगाजल; उस्मानाबादेत आतापर्यंत ५० बॉटल्सची विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पवित्र गंगाजलासाठी आता आपणास गंगोत्री किंवा ऋषीकेशला जाण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारच्या योजनेनुसार देशातील डाक कार्यालयांमध्ये नागरिकांना गंगाजल उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उस्मानाबादेत मुख्य डाकघरातही ऋषीकेश गंगोत्री येथून घेतलेले गंगामातेचे पवित्र जल उपलब्ध करून देण्यात आले आहे. २०० ५०० मिलिमीटरच्या बॉटलमध्ये गंगाजल उपलब्ध आहे. ऋषीकेश येथील गंगाजलाच्या बॉटलसाठी अनुक्रमे १५ २२ रुपये द्यावे लागेल. गंगोत्री येथील जलासाठी अनुक्रमे २५ ३५ रुपयांचे शुल्क ठेवण्यात आले आहे. उस्मानाबादेत आतापर्यंत गंगाजलाच्या ५० बॉटल्सची विक्री झाल्याचे येथील पोस्टमास्तर एस. टी. रितपुरे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद मनोज सिन्हा यांच्या हस्ते पाटणा येथे १० जुलै, २०१६ रोजी बाटलीबंद गंगाजलाच्या विक्रीचा शुभारंभ झाला होता. देशभरातील निवडक डाक कार्यालयांमध्ये हे गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले आहे. उत्तराखंड पोस्टल सर्कलद्वारा पुरवठ्यानंतर दिल्ली येथे बाटलीबंद केल्यानंतर देशभरातील पोस्टल सर्कलमध्ये त्याचे वितरण करण्यात येत आहे, असे समजते. परंतु उस्मानाबाद डाक कार्यालयातील स्टॉक नुकताच संपृष्टात आला आहे, असे रितपुरे यांनी सांगितले.

ऑनलाइनही नोंदविता येणार ऑर्डर :
नागरिकांच्या सुविधेसाठी गंगाजलाच्या बॉटलसाठी ऑनलाइन ऑर्डर नोंदविता येणार आहे. त्यासाठी https://epostoffice.gov.in या संकेतस्थळावर लॉग ऑन करावे लागेल. तेथे आपले खाते उघडल्यावर मागणी नोंदविता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...