आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर परळीत सामूहिक बलात्कार, वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आली होती महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - परळी येथे वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या गंगाखेड येथील विवाहितेवर परभणी येथील बाप-लेकासह सहा जणांनी बलात्कार केल्याची तक्रार परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आली आहे. ही घटना १४ ऑगस्ट २०१६ रोजी शहराजवळील डोंगरावरील जंगलात घडली.

गंगाखेड येथील जायकवाडी वसाहतीत राहणारी एक महिला अन्य महिलांबरोबर परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आली होती. दर्शनानंतर काही महिला मंदिराच्या पाठीमागे गेल्या. तेव्हा त्यातील एक विवाहिता शौचास गेली होती.

एकटी महिला असल्याचे पाहून परभणी येथील हरिश्चंद्र नारायण सुरवसे, सतीश हरिश्चंद्र सुरवसे या पिता-पुत्रांसह भागवत मांडू लोंढे, लक्ष्मण टेकाळे आणि अन्य दोघांनी त्या महिलेस बळजबरीने जीपमध्ये बसविले. त्यांनतर जीप परळीजवळील डोंगरावर नेऊन कोयत्याचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी शहर पोलिसांत विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पिता-पुत्रांसह सहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...