आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधवेवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर जाळण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मध्यरात्री एका विधवेला (२५) जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून जंगलात नेऊन तिच्यावर तिघा नराधमांनी बलात्कार केला. या अत्याचारानंतर पीडित महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करीत असताना महिलेने आरडाओरड केल्याने मोटारसायकलवरून आरोपी पसार झाले. ४ जून रोजी रात्री १२ ते एक वाजेच्या सुमारास औसा तालुक्यातील शिवली येथील वनविभागाच्या जंगलात ही घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भादा पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

पतीच्या निधनानंतर पीडित महिला तिच्या वडिलांकडे शिवली येथे राहत होती. चार जूनच्या मध्यरात्री ती लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. या वेळी गावातील हणमंत नामदेव आळणे (४२), समाधान दत्तू पवार (२९) व गोविंद शिवाजी आळणे (२७) यांनी त्या महिलेला जबरदस्तीने त्यांच्या मोटारसायकलवर बसवले. शिवली आंदोरा रोडवरील वनविभागाच्या जंगलात तिला नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.