आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाखेडचे एसटी चालक मुंडेंचा अजूनही शाेध लागेना, कुटुंबीय हवालदिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेपत्ता बसचालक गोरखनाथ मुंडे यांचा शाेध लागत नसल्याने घरी पत्नी अनसूया यांनी अक्षरश: हंबरडा फाेडला हाेता. नातेवाईक व गावातील महिलांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे अनसूया पतीचा शाेध घेण्यासाठी महाडलाही जाऊ शकल्या नाहीत. - Divya Marathi
बेपत्ता बसचालक गोरखनाथ मुंडे यांचा शाेध लागत नसल्याने घरी पत्नी अनसूया यांनी अक्षरश: हंबरडा फाेडला हाेता. नातेवाईक व गावातील महिलांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे अनसूया पतीचा शाेध घेण्यासाठी महाडलाही जाऊ शकल्या नाहीत.
परभणी - डोंगरी भागातील अवघ्या दोन एकर जमिनीवर माेठ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवताना हाेणारी दमछाक, वर्षानुवर्षे प्रयत्न केल्यानंतरही न लागणारी नाेकरी, अशी व्यथा घेऊन जगणाऱ्या अंतरवेलीच्या (ता. गंगाखेड) गाेरखनाथ सीताराम मुंडे यांचे नशीब अखेर सन २००८ मध्ये उजाडले. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांना एसटी महामंडळाच्या चिपळून आगारात बस चालकाची नोकरी मिळाली. गावापासून तब्बल ७०० किलोमीटर अंतरावर जाऊन ते नोकरी करीत होते. एक महिन्याच्या सुटीवर अालेले मुंडे दहा दिवसांपूर्वीच कुटुंबीयांचा निराेप घेऊन पुन्हा नाेकरीच्या गावी गेले हाेते, मात्र अाता त्यांच्या परतीच्या सर्व अाशा मावळल्या अाहेत.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने मंगळवारी मध्यरात्री दोन एसटी बसेस पुरात वाहून गेल्या. त्यातील राजापूर-बोरीवली (क्रमांक एम.एच.४०/ एन ९७३९) या बसचे मुंडे (४५) हे चालक हाेते. दाेन दिवसांच्या शाेधकार्यात या दुर्घटनेतील दहा मृतदेह हाती लागले असले तरी अद्याप मुंडेंचा तपास लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय हवालदिल अाहे. चिपळूण आगारातून बुधवारी दूरध्वनी अाल्यानंतर मुंडेंचा मुलगा दीपक (वय २०) हा महाडकडे रवाना झालाय. त्याच्या निराेपाची वाट पाहात काळजीत बुडालेले अख्खे अंतरवेली गाव देवाला साकडे घालतंय.गंगाखेडपासून २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरवेली हा पूर्णपणे डोंगरी भाग आहे. या गावात सीताराम मुंडे (वय ६३) यांची दोन मुले व त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मोठा मुलगा गोरखनाथ व लहान भरत. दोन्ही कुुटुंब एकत्रच राहतात. पत्नी अनुसया, तीन मुली व एक मुलगा दीपक असा गाेरखनाथ यांचा परिवार. या दाेन्ही कुटुंबाचा चरितार्थ केवळ दोन एकर जमिनीवरच चालायचा. मुळातच, डोंगरी भाग असल्याने कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे बस चालकाचा परवाना काढून गाेरखनाथ नोकरीसाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. लहान भाऊ भरत खासगी कंपनीत कामे करीत असे.

गोरखनाथ यांच्या दोन मुलींचे विवाह झाले. तिसरी बारावीत तर मुलगा दीपक हा बी.ए. द्वितीय वर्षात आहे. अखेर वयाच्या ३६ व्या वर्षी यांना एसटी महामंडळात नोकरी मिळाली. चिपळूण आगारात ते रुजू झाले. घरापासून खूपच दूर, परंतुर कुटुंबाला अाधार मिळण्यासाठी त्यांनी ही नाेकरी पत्करली. जेमतेम नऊ वर्षांची सेवा झालेली असताना त्यांच्यावर हे संकट काेसळले.
समाजसेवी अंतरवेली
केवळ दोन हजार लोकसंख्येचे अंतरवेली हे छाेटंसं गाव गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागात वसलेलं. वैशिष्ट्य म्हणजे या गावातील बहूतांश युवक सैन्यदल, पोलिस व अन्य जोखमीच्या क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर नोकरीस अाहेत. आपत्कालीन स्थितीला सामर्थ्याने तोंड देण्याचे काम येथील युवक समर्थपणे करतात. नक्षलवादी हल्ल्यात ११ मे २०१४ रोजी शहीद झालेला लक्ष्मण कुंडलिक मुंडे हा गोरखनाथ मुंडे यांचे चुलतभाऊ हाेते.
पुढे वाचा...
मुलीचे लग्न थाटात पार पाडून घेतला निराेप