आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाखेडमध्ये लाचखोर अधीक्षक अटकेत, 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - गंगाखेड नगरपालिकेच्या मालकीची जागा भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा अंतिम आदेश देण्यासाठी व्यापाऱ्यांकडून २५ हजारांची लाच स्वीकारणारे पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक श्यामकांत मल्लिकार्जुन काळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी  रंगेहाथ अटक केली.
 
पालिकेच्या मालकीची जागा भाडेतत्त्वावर मिळावी म्हणून एका व्यापाऱ्याने प्रक्रिया पूर्ण करून जागेची मागणी केली होती. अंतिम आदेश संबंधित व्यापाऱ्यास मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक काळे यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. त्यावर काळे यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. 
 
या व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. त्यावर या खात्याने बुधवारी सकाळी गंगाखेड येथील श्यामकांत काळे याच्या योगेश्वर कॉलनी येथील निवासस्थानी सापळा रचला. त्या वेळी व्यापाऱ्याकडे पैशाची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना पथकाने काळे यांना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...