आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई: वाहनचालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 15 लाख लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - खासगी वाहनाचा पाठलाग करत दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी लुटारूंनी वाहनचालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून वाहन थांबवले. त्यानंतर वाहनातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद गेवराई शाखेच्या शिपायावर धारधार शस्त्राने हल्ला करत त्याच्याकडील १५ लाख रुपयांची रोकड असलेली पेटी हिसकावून गेवराईच्या दिशेने पोबारा केला. ही घटना धोंडराई फाट्यावर घडली.

गेवराई येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेतून तालुक्यातील धोंडराई शाखेमधील एटीएम व ठेवीदारांना पैसे देण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता १५ लाख रुपयांची रक्कम टाटा मॅजिक (एमएच २३ एडी २४७१) या वाहनामधून बँकेचे रोखपाल विकासकुमार शर्मा, शिपाई दीपक आसाराम मुळूक व वाहनचालक किशोर खरात हे तिघे गेवराई - शेवगाव मार्गाने धोंडराईकडे निघाले होते. धोंडराई फाट्यावरून गावात जात असताना दुपारी बारा वाजता अचानक त्यांच्या वाहनाच्या मागून विनाक्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला कपडा बांधून अनोळखी दोन तरुण आले. त्यांनी वाहनचालक किशोर खरात यांच्या डोळ्यात मिरचीची पूड १५ लाख असलेली पेटी पळवली.
काहीच कळाले नाही
धोंडराई येथील शाखेचे एटीएम व पेमेंटसाठी आम्ही पंधरा लाख रुपये घेऊन निघालो होतो. आम्हाला काही कळायच्या आतच हा प्रकार घडला.
विकासकुमार शर्मा, रोखपाल, हैदराबाद बँक
तीन पथके कार्यरत
तपासासाठी तीन पथके स्थापन केली आहेत. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो होतो. लवकरच लूटमारीतील आरोपींना पकडू.
सुरेश बुधवंत, पोलिस निरीक्षक, गेवराई
बातम्या आणखी आहेत...