आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gherao To Gurdian Minister For The Reservation Demand

आरक्षण देण्‍याच्या मागणीसाठी पालकमंत्री राजेश टोपे यांना घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांची गाडी अडवून घेराव घातला.


निवडणुका जवळ आल्याने शासनाने मराठा आरक्षण अभ्यास समितीची नेमणूक केली आहे. या समितीकडे पालकमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करावी, या मागणीसाठी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालून निवेदन दिले. या आंदोलनात अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.शैलेश देशमुख, युवक तालुकाध्यक्ष लक्ष्मण डवारे यांचा सहभाग होता.