आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्यात छेडछाडीने त्रस्त मुलीने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - शेतात ये-जा करताना व मोबाइलवर फोन करून छेड काढणा-याच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने शेतातील घरात विष घेऊन आत्महत्या केली. जालना तालुक्यातील वखारी येथे सोमवारी ही घटना घडली. आरोपी गणेश जनार्दन खैरे (22) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वैजिनाथ पंढरीनाथ घुले यांची मुलगी सुलोचनाची गणेश छेड काढत असे. घुले यांनी खैरे कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्यानंतरही गणेशने छेडछाड सुरूच ठेवली. त्यामुळे सुलोचनाने टोकाचे पाऊल उचलले. आरोपींच्या अटकेची मागणी करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कुटुंबीय व नातलगांनी घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास जाधव यांनी ठाण्यात येऊन तपासाच्या सूचना केल्या. सायंकाळी 5.30 वाजता गणेश यास ताब्यात घेतले. त्यानंतर जमावाने ठाणे सोडले.