आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Child Death By Pesticide, 45 Girls Admitted In Hospital

जंतनाशक गोळी घशात अडकून बालिकेचा मृत्यू, तर ४५ मुली रुग्णालयात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मृत अर्चना रवी चव्हाण (१ वर्ष ८ महिने)
हिंगोली - अंगणवाडी सेविकेने दिलेली जंतनाशक गोळी घशात अडकून दीडवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे घडली, तर जंतनाशक गोळ्या गिळल्यामुळे कळमनुरी तालुक्यातील मसोड आणि वारंगा मसाई येथे ४५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील दोघे अत्यवस्थ आहेत. अर्चना रवी चव्हाण (१ वर्ष ८ महिने) असे मृत मुलीचे नाव आहे.

सिद्धेश्वर येथील अंगणवाडीत मंगळवारी दुपारी १२ वाजता अंगणवाडीताईंनी मुला-मुलींना अल्बेंडाझोल गोळ्या दिल्या. अर्चना चव्हाण या मुलीच्या घशात गोळी अडकल्याने तिचा आवाज बंद झाला. तिला काहीही सांगता येत नसल्यामुुळे घशात गोळी अडकल्याची शंका अंगणवाडीताईंना आली. तिला औंढा येथे हलवण्यात आले. औंढा येथेही उपचार न झाल्याने तिला हिंगोलीकडे हलवण्यात येत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील प्राथमिक शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांमुळे कळमनुरी येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. दुपारी ४ वाजता काही विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले, परंतु ममता दत्तराव चौधरी (१०) या मुलीची प्रकृती सुधारली नसल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. अशीच घटना कळमनुरी तालुक्यातीलच मसोड येथे घडली असून जंतनाशक गोळ्या दिल्याने १० विद्यार्थ्यांना मळमळ, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. निशिगंधा संतोष धुळे (९) या मुलीच्या प्रकृतीतही सुधारणा झाली नव्हती. तिच्यावर मसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत, उर्वरित विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी नॉट रिचेबल
तीन गावांमध्ये जंतनाशक गोळ्यांमुळे विद्यार्थी आजारी पडले असले, तरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बनसोडे यांचा मोबाइल रात्री ७ वाजेपर्यंत संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची अधिकृत माहिती मिळाली नाही. तसेच सिद्धेश्वर येथील मुलीचा मृत्यू गोळी घशात अडकल्यामुळे झाला असल्याचा दावा करण्यात येत असला तरी ४५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ शाळांवर का आली, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

पुढे वाचा... गोळी घशात आडवी अडकल्याची शक्यता