आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Commit Suicide Because Taunting Of Road Romeo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छेडछाडीस कंटाळून मुलीची आत्महत्या, आरोपी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जीपचालकाकडून सतत होत असलेल्या लग्नाच्या मागणीला कंटाळून आठवीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील नाथापूर येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी गणेश दत्तात्रय जाधव (22, रा. नाथापूर) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.


नाथापूर येथील आठवीच्या वर्गात शिकणा-या मुलीस गणेश जाधव हा त्रास देत होता. सततच्या या त्रासाला ही मुलगी कंटाळली होती. 14 फेब्रुवारी रोजी आरोपी चव्हाण तिच्या शेतात गेला. त्याने तेथे तिची पुन्हा छेड काढली. आपल्यासोबत लग्न करण्याची त्याची मागणी होती. मुलीचे नातेवाईक घटनास्थळी येताच त्याने तेथून पलायन केले. याच ताणतणावातून मुलीने दुपारी एक वाजता सांगवत शिवारात विष घेतले. कुटुंबीयांना हा प्रकार कळताच तिला तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण पसरले होते.