आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी करायचा विद्यार्थीनींना कामूक भावनेने स्‍पर्श; मग काढायला लावले कपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोघांच्‍या मध्‍ये असलेल्‍या याच शिक्षकाने मुलींचा विनयभंग केल्‍याचा आरोप आहे. - Divya Marathi
दोघांच्‍या मध्‍ये असलेल्‍या याच शिक्षकाने मुलींचा विनयभंग केल्‍याचा आरोप आहे.
लातूर – जिल्‍ह्यातील पानगाव (ता. रेनापूर) येथील जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षक गणपत लोकरे हा शाळेतील कामूक भावनेने स्‍पर्श करायचा अश्लिल बोलायचा, अश्लिल चित्रफि‍ती दाखवयाचा. मात्र, त्‍याच्‍या दहशतीमुळे त्‍याच्‍याविरोधात कुणी मुलगी बोलण्‍यास धजावली नाही. पण, त्‍यामुळे तो निर्ढावला आणि त्‍याने चक्‍क एका मुलीला स्‍वत:समोर कपडे बदलवण्‍यास भाग पाडले. पीडित मुलीने घरी येऊन हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तत्‍काळ पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली.
नेक‍मे काय आहे प्रकरण
गणपत लोकरे हा शाळेतील विद्यार्थिनीशी नेहमीच असभ्य वर्तन करत असल्‍याचा आरोप दबक्‍या आवाजात मुली करत होत्‍या. पण, एका मुलीने धाडस करून झाला प्रकार घरी सांगितला. पोलिसांनी लोकरे याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक केली आहे. सध्‍या तो 14 दिवसांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत आहे.
या आधीही केले कारमाने
लोकरे याने यापूर्वीही दर्जी बोरगावमध्ये असेच कारमाने केल्‍याचे समोर आले आहे. पण, त्‍यावेळी त्‍याच्‍या विरुद्ध गुन्‍हा दाखल झाला नव्‍हता. लोकरे याच्‍या गैरवर्तनाला शाळेतील मुख्‍याध्‍यापिका यांनीही दुजोरा दिला आहे.